माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

चक्षु आणि अक्षु..

चक्षु म्हणजे डोळे. अक्षु ने आजतागायत त्याच्या चक्षू मार्फत बघितलेली प्रत्येक वस्तू आणि अनुभवलेली नेत्रसुख यासाठी सर्वेश्वर परमात्म्याचा तो ऋणी आहे. डोळे म्हणजे आपल्या देहातील पंचेंद्रियातील एक इंद्र. जस्ट टू मेक इट सिम्पल, इंद्रिय म्हणजे सेन्सेस. लहानपणी डोळे टपोरे आणि स्वच्छ असावे म्हणून आई अक्षुच्या डोळ्यात अंजन घालायची. काजळ लावायची. लहानपणी काय-काय बघितलं हे आता नीट आठवत नाहीये. तरीही काही क्षण अविस्मरणीय आहेत ते फक्त आणि फक्त चक्षूंमुळे. लहानपण तारुण्यात बदलणार होतंच की चक्षूंना साथ लाभली ती चष्म्याची. तो आता सुटता सुटेना. नजर जरा कमजोर झालीय आता. वय? विशीच्या सुरवातीचं. डोळे ब्लर झाले हो. पंधरा-वीस फुटावर उभा असलेला माणूस सुद्धा नीट ओळखता येत नाहीये आता. लहानपण अक्षुसाठी अविस्मरणीय अनुभव देणारं राहिलंय. आता काही ठिकाणी क्षण साठवून ठेवण्याकरिता फोनचा वापर करावा लागतो. अक्षुचं हे दुर्भाग्यच!

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

आयएम नॉट युअर काका..

सुमारे ७-८ महिन्यांपूर्वीची ही घटना असावी. नागपूरात असताना संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या स्वयंपाकासाठी लागणारी भाजी विकत घ्यायला म्हणून मंडईत गेलो. भाजी निवडली आणि तिथे त्या भाजीच्या हातगाडीवर अगदीच १२-१३ वर्षाचा एक मुलगा होता. घेतलेल्या भाजीचा हिशोब करायचा म्हणून त्याला विचारणा केली असता "अस्सी रूपये हुए अंकल" असा म्हणाला. मी आतून जोरात किंचाळत म्हणालो "मैं अंकल नहीं हूँssss!!!"

त्याने मला 'काका' म्हणणे म्हणजे एखाद्या कुमारिकेला 'काकू' म्हणण्यासारखे होते.

आय नो, कोणाला 'काका' किंवा 'काकू' म्हणायला लग्न करायचेच असं जरूरीचे नाही, बट अॅटलिस्ट वय तर मॅटर करतोच ना. म्हणजे बघा, सपोज कोणाचं लग्न झालं असेल तर ठीकये, तुम्ही म्हणा त्यांना 'काका', कोण अडवतोय तुम्हाला? पण मी तर माझ्या २० शीत आहे, मला 'दादा' म्हण, 'भैय्या' म्हण.. 'काका'??? नॉट डन!

पुन्हा, काही आठवड्यांपूर्वी भाजी घ्यावयाची म्हणून मी शेतकरी भंडारात गेलेलो. तिथे एक लहान, ९-१० वर्षाचा मुलगा भेटला. दम आलू करीता लागणारे बटाटे त्यांनी वेगळ्या टोपलीत ठेवले होते. तो मुलगा मला म्हणाला 'ये वाले आलू महँगे हैं अंकल'. परत एकदा आतून किंचाळी देत म्हणालो, 'देवाssssss काय हेssss???'

मुले ही देवाघरची फूले आहे असं म्हणतात, मग माझ्याच भाग्याला निवडुंगाची काटे?? व्हाय?

देवा, तुला माझ्याशी काही कम्प्लेंट असेल तर तसं डायरेक्ट मला सांग, सॉर्ट आउट करूया, पण असले 'काका' आणि 'अंकल' वाले रॉकेट्स माझ्यावर सोडू नकोस प्लीज.

आणि हो, सौ बात की एक बात, आयएम नॉट युअर काका..

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

मी कोण? तुमचा फोन!

'दिल ढूँढ़ता हैं, फ़िर वही फ़ुरसत के रात-दिन'. मौसम मूव्ही मधलं भूपेन्द्र सिंह आणि लता ताईंनी गायलेलं हे गाणं त्या काळी जितकं रिलेवंट होतं तितकंच आजही आहे. नेहमी-नेहमी कानावर येतं, 'फोन ही गरजेप्रमाणे वापरण्याची वस्तू आहे'. पण होतं काय? आपण एका कानाने ऐकतो आणि दुसर्‍या कानातून सोडून देतो. हा मानवी स्वभाव सगळीकडे सर्रासपणे आढळतो. अहो, फोन ही शोभेची वस्तू म्हणून त्याला इतकं महत्त्व दिल्या गेलंय की लोक आजकाल दागिने कमी आणि फोन जास्त मिरवतात!

यातच एक किस्सा आठवला. पुण्यात असताना श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे लगभग से ऑलमोस्ट नेहमीच दर्शन घेण्याचे भाग्य माझ्या नशिबी होते. नेहमी आत जाऊन दर्शन घेत नसे. बाहेरूनच मुख दर्शन घेऊन परस्पर निघून जात असे. पण एक सीनारिओ असा निरीक्षणास आला की, जो तो आप-आपल्या फोन मधून देव टिपत असत. दोस्तहो.. फोन मधून मूर्ती टिपू शकाल खरी, दर्शन मात्र मनात आस्था आणि श्रद्धा ठेवून डोळ्याने घ्यावे लागतात. तेव्हा देव पावतो. 

तसा देवाला त्रास होत नसेलच, पण तो ही तुमच्या-माझ्या फोनच्या एक्सेस यूज मुळे नक्कीच म्हणत असेल, "अरे वत्सा, जरा माझ्याकडे बघ, काय त्या फोन च्या खोट्या दुनियेत जगतोयस, मी डोळ्यापुढे असताना सुद्धा तुला फोनच्या लेन्स मधून मला बघायची इच्छा आहे?"

सॉरी बॉस, बट दिस इज कम्प्लीटली अनएक्सेप्टेबल!

बाकी, इट्स ऑल यूअर चॉईस.

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

कॉन्फिडन्स!

नुकताच आमच्या कॉलेज मध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. तसा मी फारसा असल्या कार्यक्रमात जात नसे. तरी, नवीन ओळखी व्हाव्यात, फैकल्टीशी जुळवून घ्यावं (अर्थात, इंटरनल मार्क्‍स देताना ओळखी कामी येईल असा स्वार्थी विचार मनाला शिवून गेला म्हणूनच) हा विचार मनी ठेवून प्रोग्राम अटेंड केला. त्यात एक परफार्मेंस सादर करायला सुमारे चाळिशीत असलेला एक वयस्क स्टेज वर आला आणि आपलं गाणं गायला त्यानं सुरवात केली. 'सागर किनारे दिल ये पुकारे' हे माझ्या आवडणार्‍या गाण्यांपैकी एक. भले त्यांचा आवाज बेसूर होता, पण त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद त्यांच्या स्वराला कम्प्लीट कवर करून घेत असे. तेव्हा हाच विचार आला की 'काय माणूस आहे यार, सा-रे-ग-म  माहिती नसताना सुद्धा इतक्या लोकांपुढे गाणं गातोय, सॉलिssडय हे!'

गाणं संपलं, उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या, सोबत काहींनी शिट्ट्या सुद्धा मारल्या.. काहीतर म्हणे 'वन्स मोअर' (चेष्टा करत असावेत..) 

सो, सौ बात की एक बात..

जगा, अगदी फ्रिली जगा..

एकूणएक दिवस, एकूणएक मिनिट, एकूणएक सेकंद मॅटर करतो माय फ्रेंड. 

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

गणू बाप्पा मोरया..

".. फक्त ३६५ दिवस बाकी", ".. फक्त १० दिवस बाकी", ".. फक्त २४ तास बाकी" म्हणता-म्हणता तुमचा आमचा (अर्थात सर्वांचाच) लाडका गणू बाप्पा आला.

तो येतो, राहतो, आपल्यात रमतो आणि निरोप घेताना मात्र डोळ्यात अश्रू आणि पुढल्या वर्षाची प्रतीक्षा देऊन जातो. 'बाप्पा' ह्या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर, जो आदरणीय आहे, जो पूज्य आहे असा. गणेश चतुर्थीचा उत्साह आणि उमेद ही काही औरच!

पण, लोकमान्य टिळकांनी गणेश स्थापनेची संकल्पना का बरं अमलात आणली असेल?

सोप्पं आहे, सार्वजनिकरीत्या तमाम हिंदू लोकांनी एकत्र यावं, जाति-कुजातिंचा उंबरठा ओलांडून एकत्र यावं ह्या उद्देशाने त्यांनी ही परंपरा सुरू केली. पण आताच्या घडीला काय होतंय हो? मोठ-मोठाले अपार्टमेंट्स झाले, बिल्डिंग्स् उभारल्या गेल्या, प्रत्येकाचे स्वतंत्र फ्लॅट्स झाले आणि आपला गणू बाप्पा मर्यादित होत गेला. 'ओवाळा-ओवाळा' म्हणायला जेथे हजारोंच्या संख्येने लोकं यायची ती संख्या अवघ्या ४-५ वर येऊन ठेपली. ज्याची त्याची श्रद्धा-आस्था आहे अँड आय अॅम नोबडी टू कमेंट ऑन दॅट. पण, सामाजिक बांधिलकीचं प्रतीक गणल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं काय? 

'देव भावाचा भुकेला' हे माहिती असताना देखील डेकोरेशन मात्र सुरेख असावं, "आमच्या घरचा गणपती येऊन बघा, यावर्षी डेकोरेशनचा वेगळा पॅटर्न ट्राय केलाय" असं म्हणून गणेशोत्सवाची अख्खी शोभा पाण्यात घालणारे आपणच! अहो, जो देव, जी शक्ती दुनियेच्या स्पर्धेत आपल्या पाठीशी उभी असते, त्याच्याच देखाव्यासाठी स्पर्धा का?

ही श्रद्धा नव्हे, दंभाचारच! 

ख़ैर, जाने दो. आता तो आलाय, आपले सुखं-दुःखं, वेदना, त्रास, आनंद सगळं-सगळं त्याच्याशी शेअर करूयात आणि नेहमी हसतमुख राहूयात.

बोला, गणपती बाप्पा मोरयाsss..

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

डियर ज़िंदगी, थैंक्यू सो मच!

तुम्हाला प्रश्न असेल की मी कोण? माझं कर्तुत्व काय? मी काय करतो? वैगेरे वैगेरे. खरं तर मी कोणीच नाही. लहानपणापासून ते आता तारुण्यापर्यंत मी नेहमीच एव्हरेज राहिलोय. ते अभ्यासात असू देत किंवा इतर कोणत्याही असाईनमेन्टस् मधे असू देत. माझ्या असण्या किंवा नसण्याचा कितपत फरक पडतो हे जेन्युईनली आय डोन्ट नो. मी जगतो, अगदी मनसोक्त. आजच्या घटकेला हे लिहितांना अगदी मन आनंदी आहे. भरपूर लहान-मोठाले चॅलेंजेस् फेस करत आज खर्या अर्थाने मित्रांना किंवा नातेवाईकांना 'मला अनुभव आहे' हे बोलताना तोंडाला फेस येत नाही. परमेश्वर दयाळू आहेच, सोबत माझ्या अवतीभवती राहणारे, मला दररोज भेटणारे शेकडो अनोळखी लोक हे सुद्धा दयाळू आहेत (म्हणजे काही प्रमाणात हंss.) 

डियर ज़िंदगी, काल एस.टी ने प्रवास करीत होतो. तितक्यात गाणी ऐकताना डेड सिरियस झालो. अचानक! माहिती नाही का. खिडकी बाहेर बघताना, विजेचे खांब मागे जात होते, ढगं सरकत होती, मैल पार पडत होती आणि एस.टी. तिच्या थांब्याकडे वाटचाल करीत होती. लगेच ध्यानी आलं, एस.टी. म्हणजे मी, माझं बालपण आणि तारुण्य. मागे सरसावत जाणारी विजेची खांबं म्हणजे आजवर भोगाव्यास मिळालेली सुखं-दुःखं. हळू हळू आपण सुद्धा म्हातारं होत चाललोय.

डिअर ज़िंदगी, एकदाचं मला सुख वैगेरे काही-काही नको. चालेल. मी अॅडजेस्ट करून घेईन, पण प्लीज कोणत्याच गोष्टीची मला 'खंत' ठेवू नकोस. 'जर तेव्हा हे केलं असतं तर?' 'शेsss याsssर हे राहून गेलं' असले मिनी अटैकस् मला देऊ नकोस.

डिअर ज़िंदगी, मला तुझ्या असण्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. मी एकलकोंडा असलो तरी नव-नवीन लोकांशी भेटायचंय, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या विषयी जाणून घ्यायचंय. अख्खं जग फिरायचंय म्हणजे चार मित्रांमध्ये 'पूर्ण जग फिरलो रे, पण आपल्या भारतासारखा देश कुठेच नाही' बोलताना छाती फुगवून उगाच शेखी झाडायचीय.

डिअर ज़िंदगी, तू मला एक संधी दिलीस, मला त्या संधीचं सोनं करून तुला रिटर्न गिफ्ट द्यायचंय.

बाकी, तुझाच मी.. माझीच तू.. डिअर ज़िंदगी, आय लव्ह यू!

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...