नुकताच आमच्या कॉलेज मध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. तसा मी फारसा असल्या कार्यक्रमात जात नसे. तरी, नवीन ओळखी व्हाव्यात, फैकल्टीशी जुळवून घ्यावं (अर्थात, इंटरनल मार्क्स देताना ओळखी कामी येईल असा स्वार्थी विचार मनाला शिवून गेला म्हणूनच) हा विचार मनी ठेवून प्रोग्राम अटेंड केला. त्यात एक परफार्मेंस सादर करायला सुमारे चाळिशीत असलेला एक वयस्क स्टेज वर आला आणि आपलं गाणं गायला त्यानं सुरवात केली. 'सागर किनारे दिल ये पुकारे' हे माझ्या आवडणार्या गाण्यांपैकी एक. भले त्यांचा आवाज बेसूर होता, पण त्यांच्या चेहर्यावरचा आनंद त्यांच्या स्वराला कम्प्लीट कवर करून घेत असे. तेव्हा हाच विचार आला की 'काय माणूस आहे यार, सा-रे-ग-म माहिती नसताना सुद्धा इतक्या लोकांपुढे गाणं गातोय, सॉलिssडय हे!'
गाणं संपलं, उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या, सोबत काहींनी शिट्ट्या सुद्धा मारल्या.. काहीतर म्हणे 'वन्स मोअर' (चेष्टा करत असावेत..)
सो, सौ बात की एक बात..
जगा, अगदी फ्रिली जगा..
एकूणएक दिवस, एकूणएक मिनिट, एकूणएक सेकंद मॅटर करतो माय फ्रेंड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा