आज बर्याच दिवसांनी ब्लॉग लिहायला घेतलाय आणि ब्लॉगची ही साईट हंड्रेड अँड वन पर्सेंट मला हेच म्हणत असेल की, 'नाईस टू सी यू अगेन, मि. अक्षय. व्हेअर हैव यू बीन सीन्स सो मेनी मंथस्?'
हेच एखाद्या सुंदर मुलीने मला विचारलं असतं तर कदाचित 'एवढ्या महिन्यांपासून तुझ्या विचारात हरवलो होतो' असं काहीसं उत्तर मी दिलं असतं. पण तूर्तास, 'शेड्यूल खूप पॅक होतं, त्यामुळे लिहायला फारसा वेळ देऊ शकलो नाही' हेच म्हणेल. असो.
दोन शब्दांचा टाइटल वाचून मला ह्या ब्लॉग मध्ये नेमकं काय म्हणायचंय ह्याची तुम्हाला पूर्णपणे कल्पना आली असेलच आणि मला हेच अपेक्षीत आहे.
आता वरील उल्लेखीत ओळींमध्ये सर्रासपणे मी कोणत्यातरी एका 'सुंदर' मुलीला फ्लर्ट केलं जे की 'सुखी एकांत' ह्या टाइटल ला अनुसरून तर नक्कीच नाहिये. पण, एकांतात माणूस फ्लर्ट करू शकत नाही असं तरी कुठे लिहिलंय ना?
मुद्द्यावर येऊया.. चला तर, 'सुखी एकांत' ह्या दोन शब्दांचा अर्थ मला काय कळलाय तो जाणून घेऊया..
बरं, तुम्हाला कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ओळी आठवतात का?
एक बाकी एकाकी,
एक अंत एकांत..
एक अडके एकात,
एक एकटया जगात..
एक खिडकी एक वारा,
एक चंद्र एक तारा..
एक नजर एक वाट,
एक एकटा.. एकटाच..
बस्sssss!! किती सोपंय हे! ह्या ओळी ज्याला कळल्या, त्याला हे जग अगदी रिलैक्सपणे जगता येईल.
काही आठवड्यांपूर्वी सन १९६५ रोजी प्रदर्शित झालेला देवानंद यांचा 'गाईड' मूव्ही बघितला. त्या मूव्हीच्या उत्तरार्धातून प्रेरित माझं हे ब्लॉग. देवानंदच्या अभिनयाचे क्या कहने, खूपच भारी. पण, मनाला हेलकावा देणारी त्या मूव्हीची कथा सुद्धा तितकीच सुंदर आणि मार्मिक मला वाटली. मनात हळुवार स्पर्श करून गेलेला विचार असा आला की माणसाने काही काळ का होईना, पण एकटं जगून बघावं, मनातल्या किंवा मेंदूतील विचारांनी आपल्यावर ताबा घेण्याआधी, आपण त्या विचारांना आटोक्यात घेणं अती जरूरीचं आहे.
बाकी, मी माझ्या एकांतात सुखी आहे, तुझं काय स्टेटस आहे, माय डिअर फ्रेंड?
दि. ०९.०५.२०२५
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा