माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

आयएम नॉट युअर काका..

सुमारे ७-८ महिन्यांपूर्वीची ही घटना असावी. नागपूरात असताना संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या स्वयंपाकासाठी लागणारी भाजी विकत घ्यायला म्हणून मंडईत गेलो. भाजी निवडली आणि तिथे त्या भाजीच्या हातगाडीवर अगदीच १२-१३ वर्षाचा एक मुलगा होता. घेतलेल्या भाजीचा हिशोब करायचा म्हणून त्याला विचारणा केली असता "अस्सी रूपये हुए अंकल" असा म्हणाला. मी आतून जोरात किंचाळत म्हणालो "मैं अंकल नहीं हूँssss!!!"

त्याने मला 'काका' म्हणणे म्हणजे एखाद्या कुमारिकेला 'काकू' म्हणण्यासारखे होते.

आय नो, कोणाला 'काका' किंवा 'काकू' म्हणायला लग्न करायचेच असं जरूरीचे नाही, बट अॅटलिस्ट वय तर मॅटर करतोच ना. म्हणजे बघा, सपोज कोणाचं लग्न झालं असेल तर ठीकये, तुम्ही म्हणा त्यांना 'काका', कोण अडवतोय तुम्हाला? पण मी तर माझ्या २० शीत आहे, मला 'दादा' म्हण, 'भैय्या' म्हण.. 'काका'??? नॉट डन!

पुन्हा, काही आठवड्यांपूर्वी भाजी घ्यावयाची म्हणून मी शेतकरी भंडारात गेलेलो. तिथे एक लहान, ९-१० वर्षाचा मुलगा भेटला. दम आलू करीता लागणारे बटाटे त्यांनी वेगळ्या टोपलीत ठेवले होते. तो मुलगा मला म्हणाला 'ये वाले आलू महँगे हैं अंकल'. परत एकदा आतून किंचाळी देत म्हणालो, 'देवाssssss काय हेssss???'

मुले ही देवाघरची फूले आहे असं म्हणतात, मग माझ्याच भाग्याला निवडुंगाची काटे?? व्हाय?

देवा, तुला माझ्याशी काही कम्प्लेंट असेल तर तसं डायरेक्ट मला सांग, सॉर्ट आउट करूया, पण असले 'काका' आणि 'अंकल' वाले रॉकेट्स माझ्यावर सोडू नकोस प्लीज.

आणि हो, सौ बात की एक बात, आयएम नॉट युअर काका..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...