'दिल ढूँढ़ता हैं, फ़िर वही फ़ुरसत के रात-दिन'. मौसम मूव्ही मधलं भूपेन्द्र सिंह आणि लता ताईंनी गायलेलं हे गाणं त्या काळी जितकं रिलेवंट होतं तितकंच आजही आहे. नेहमी-नेहमी कानावर येतं, 'फोन ही गरजेप्रमाणे वापरण्याची वस्तू आहे'. पण होतं काय? आपण एका कानाने ऐकतो आणि दुसर्या कानातून सोडून देतो. हा मानवी स्वभाव सगळीकडे सर्रासपणे आढळतो. अहो, फोन ही शोभेची वस्तू म्हणून त्याला इतकं महत्त्व दिल्या गेलंय की लोक आजकाल दागिने कमी आणि फोन जास्त मिरवतात!
यातच एक किस्सा आठवला. पुण्यात असताना श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे लगभग से ऑलमोस्ट नेहमीच दर्शन घेण्याचे भाग्य माझ्या नशिबी होते. नेहमी आत जाऊन दर्शन घेत नसे. बाहेरूनच मुख दर्शन घेऊन परस्पर निघून जात असे. पण एक सीनारिओ असा निरीक्षणास आला की, जो तो आप-आपल्या फोन मधून देव टिपत असत. दोस्तहो.. फोन मधून मूर्ती टिपू शकाल खरी, दर्शन मात्र मनात आस्था आणि श्रद्धा ठेवून डोळ्याने घ्यावे लागतात. तेव्हा देव पावतो.
तसा देवाला त्रास होत नसेलच, पण तो ही तुमच्या-माझ्या फोनच्या एक्सेस यूज मुळे नक्कीच म्हणत असेल, "अरे वत्सा, जरा माझ्याकडे बघ, काय त्या फोन च्या खोट्या दुनियेत जगतोयस, मी डोळ्यापुढे असताना सुद्धा तुला फोनच्या लेन्स मधून मला बघायची इच्छा आहे?"
सॉरी बॉस, बट दिस इज कम्प्लीटली अनएक्सेप्टेबल!
बाकी, इट्स ऑल यूअर चॉईस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा