माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

गुरुवार, २६ जून, २०२५

माल्यार्पण इज नॉट अ शो!

नुकतेच परम पूजनीय श्री गोळवलकर गुरूजी यांची पुण्यतिथी होती आणि त्या निमित्ताने नागपुरातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने गुरुजींना मानवंदना देण्याकरिता माल्यार्पण कार्यक्रम आयोजिला होता. अर्थात मी तेथे गेलो म्हणूनच हा ब्लॉग मला लिहावासा वाटला.

मनी ना ध्यानी, मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आताच्या काळातील नियमित घडणार्‍या घटनेला साक्षी झालो. ती घटना म्हणजे 'फोटोग्राफी'. बार रूम तुडुंब भरून गेली होती, गर्दी इतकी की काही सुचेना. अश्यात आगमन झाले ते प्रमुख पाहुण्यांचे. ते आले, मानवंदना दिली, माल्यार्पण केलं आणि.. आणि अखेर सुरू झाला 'फोटो सेशन!' कधी एकट्याचा तर कधी ग्रुपने. पण एक मिनिटं, गोळवलकर गुरुजींच्या विचारांचं काय? त्यांनी केलेल्या कार्याचं काय? सपशेल विसर? 

रा. स्व. संघाचं डॉक्टर हेडगेवारांकडून ज्यावेळी बीज रोवलं गेलं तेव्हा गोळवलकर गुरूजींचा आद्य सरसंघचालकांशी संपर्क झाला नव्हता. गुरुजींचा हेडगेवारांशी कसा संपर्क आला ते आपण नंतर जाणून घेऊया, पण जेव्हा हेडगेवार हे आपल्या शेवटच्या दिवसांत होते तेव्हा आपले संघ कार्य कोण पुढे नेणार? असा प्रश्न त्यांना पडला आणि उत्तर होतं 'माधव सदाशिव गोळवलकर' उपाख्य 'गुरूजी'. काय महती असेल त्यांची की त्यांच्या कार्याला ओळखून डॉक्टरांनी गुरुजींना सरसंघचालक बनवले. 

गुरूजींनी पूर्ण देशभर संघ कार्याचा प्रचार केला, अख्खं भारत पिंजून काढलं, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न केला आणि संघ अजरामर ठेवण्याकरिता सतत कार्य करीत राहीले. 

संघ गीत मालेतील 'चाहिए आशिष माधव नम्र गुरूवर प्रार्थना।' हे गीत माझं वन ऑफ़ दी फेव्हरेट आहे. हे गीत ऐकुन डोळे अक्षरशः पाणावतात आणि तना-मनात ऊर्जेचा संचार होतो ते औरच! 

त्या दिवशी फोटोसेशन करणार्‍यांनी माल्यार्पण होताच गुरूजींच्या विचारांना विसंगत असे काहीसे कृत्य केलच असतील. अॅटलिस्ट आपण ज्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत त्यांच्या विषयी, त्यांच्या कार्या विषयी जरा का होईना माहिती करून ठेवावी, म्हणजे काय ना, नसता तो शो-ऑफ होणार नाही आणि समाजाच्या हिताचं काम आपण करू शकू..


1 टिप्पणी:

  1. आजचे लोक विचारांचे भुकलेले नसुन फोटो व प्रसिद्धी कडे कल जास्त वाढलेला दिसतो व तो थोड्या प्रमाणात असावा लागतो. पण जास्त प्रमाणात होऊ नये. महापुरुषांचा विचार हा आत्मसात करण्याची आवश्यकता वाटते. प.पु डॉ हेडगेवार व पण.प. पु श्री गुरुजीं जे विचार‌ सांगितले त्या विचारांना घेऊन चालत असताना शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि तो विचार निरंतर सुरू आहे. या शंभर वर्षात संघानी भरपूर सेवा कार्य केले आहेत पण त्याची प्रसिद्धी कधीच केली नाही लोकांनी हे समजून संघाचे अनुसरण करावे असे मला वाटते आजचे लोक प्रसिद्धीमुख न होता विचार मुख झाले पाहिजे.

    उत्तर द्याहटवा

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...