डियर ज़िंदगी, काल एस.टी ने प्रवास करीत होतो. तितक्यात गाणी ऐकताना डेड सिरियस झालो. अचानक! माहिती नाही का. खिडकी बाहेर बघताना, विजेचे खांब मागे जात होते, ढगं सरकत होती, मैल पार पडत होती आणि एस.टी. तिच्या थांब्याकडे वाटचाल करीत होती. लगेच ध्यानी आलं, एस.टी. म्हणजे मी, माझं बालपण आणि तारुण्य. मागे सरसावत जाणारी विजेची खांबं म्हणजे आजवर भोगाव्यास मिळालेली सुखं-दुःखं. हळू हळू आपण सुद्धा म्हातारं होत चाललोय.
डिअर ज़िंदगी, एकदाचं मला सुख वैगेरे काही-काही नको. चालेल. मी अॅडजेस्ट करून घेईन, पण प्लीज कोणत्याच गोष्टीची मला 'खंत' ठेवू नकोस. 'जर तेव्हा हे केलं असतं तर?' 'शेsss याsssर हे राहून गेलं' असले मिनी अटैकस् मला देऊ नकोस.
डिअर ज़िंदगी, मला तुझ्या असण्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. मी एकलकोंडा असलो तरी नव-नवीन लोकांशी भेटायचंय, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या विषयी जाणून घ्यायचंय. अख्खं जग फिरायचंय म्हणजे चार मित्रांमध्ये 'पूर्ण जग फिरलो रे, पण आपल्या भारतासारखा देश कुठेच नाही' बोलताना छाती फुगवून उगाच शेखी झाडायचीय.
डिअर ज़िंदगी, तू मला एक संधी दिलीस, मला त्या संधीचं सोनं करून तुला रिटर्न गिफ्ट द्यायचंय.
बाकी, तुझाच मी.. माझीच तू.. डिअर ज़िंदगी, आय लव्ह यू!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा