माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

इंडियन इंग्रज, सुशिक्षित महामूर्ख..

वर्ष २०२४ पूर्णत्वाला आलाय आणि सोशल मीडियावर हॅप्पी न्यू ईयरचे वारे वाहत आहेत. कुठे थर्टी फर्स्ट चा प्लॅन बनतोय तर कुठे नवीन वर्षाचे नवीन रिसॉल्यूशन्स बनताहेत. एकंदरीत सगळीकडे उत्साह जोमात आहे. मॉलस्मध्ये इतके सुरेख देखावे उभारण्यात आलेत की काय सांगू.. 

बरं, तुम्हाला आठवताय का, गुढीपाडवा असेल आणि तेव्हा ह्याच मॉलस्मध्ये मोsssठीsss गुढी उभारली असावी? नाही ना? तीच तर गम्मत आहे लोकं हो!
वेस्टर्न कल्चर फॉलो करताना मूळ भारतीय संस्कृतीचा आपल्याच मार्फत ह्रास होतोय. घराबाहेर कितीही संघटना जागृतीकरण करीत असल्या तरी घरातील चार भिंतींच्या आतले विचार मॅटर करतात. नव्हे, आपण कुठे भरकटत चाललोय याचं एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 
काय महत्व इंग्रजी नवीन वर्षाचं? काही वैशिष्ट्ये असतील तर नक्कीच सांगा मला. फक्त कॅलेंडर बदलतो हेच एक ठाऊक आहे. वातावरणात, हवा-पाण्यात, नैसर्गिक इ.इ. काहीच बदल नाही. हिवाळ्यात दुपारी कडक ऊन, संध्याकाळी पाऊस आणि रात्री गारठा, हेच का तुमचं थर्टी फर्स्ट?

सकारात्मकता कुठेय?

तेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला बघा, वातावरण कसं खुशनुमा होतं ते. चहूकडे प्रसन्न वातारण असतं, नैसर्गिक बदल होतो. त्या दिवसाला विशेष महत्व आहे. तोच आपला न्यू ईयर आहे पोरं हो! आपलं कल्चर, आपलं ट्रेडेशन आपल्यालाच जपायचंय. डिजे च्या तालावर धांगडधिंगा करण्यापेक्षा पाडवा पहाट अनुभव करून बघा. तुम्हाला सौ टक्का कळेल गुढीपाडव्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट!

आता तरी जागा आणि गुढीपाडवा हाच आपला न्यू ईयर म्हणून सेलीब्रेट करा.

'इंग्रजी' नवीन वर्षाच्या 'इंडियन' इंग्रजांना खूप शुभेच्छा! 

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

स्कूल डेज, वन्स मोअर..

या वर्षीची दिवाळी हे खरच सुंदर होती. तब्बल सात वर्षांनी आम्ही शाळकरी मित्र एकत्र भेटलो. प्लॅन फक्त बॉइज् साठीच ठरला होता म्हणून आम्ही सगळी मुलं एका ठिकाणी भेटलो. आठवणी जाग्या झाल्या. त्या दिवशी गेल्या सात वर्षात मला हसणं विकत घ्यावं लागलं नव्हतं. जेन्युईन हॅप्पीनेस म्हणतो ना, ते हेच! 
काय ती मजा, एकमेकांची टिंगल चेष्टा, शाळेतील एकमेकांचे किस्से, बापरे! ती वेळ संपू नये असंच वाटत होतं. कधी जर कोणत्या वैज्ञानिकाने वेळ थांबविण्यासाठी काही उपकरण बनवलेच तर प्लीज शाळेतील मित्रांसोबतची वेळ फ्रीज करा. कारण, ती वेळ पुन्हा परतत नाही. 
आम्ही भेटण्याआधी माझ्या मनात किमान एक तास तरी नीट जाऊदे असं वाटत असताना भुर्रकन चार तास कशी निघून गेली हे कळायला काही मार्गच नव्हता. सगळी मित्रमंडळी वयाने मोठी झालीये, जबाबदार झालीये. काही जण जॉब करतात, काही जण व्यवसाय तर काही माझ्यासारखचं शिक्षण शिकतायत. सगळे आपापल्या परीने मेहनत करतायत. लवकरचं सगळे पुन्हा एकदा यशवंत, कीर्तीवंत होऊन भेटू आणि अश्याच गप्पा हाणूत. 
यातच मला एक सांगावंसं वाटतं की, गेल्या काही आठवड्यांपूर्वी मी माझ्या शाळेत एका कामानिमित्त गेलो होतो. तब्बल सात वर्षांनी! संडे होता तरीपण आय वॉज लकी इनग, की शाळेतील कार्यालय सुरू होतं. माझं काम पूर्ण व्हायला लगभग से ऑलमोस्ट पंधरा मिनटे शिल्लक होती. तोवर, मी शाळेत फिरलो, अख्खं प्रिमायसेस पिंजून काढलं, ते मैदान, ती सायकल पार्किंग ची जागा, तो वर्ग, तो फळा इ.इ.
मॅट्रिकच्या परीक्षेची तयारी करताना जितकी उजळणी होत नाही तेवढी मला त्या दिवशी होत होती, तेही ओल्ड स्कूल डेज् ची.. खरोखर, अविस्मरणीय आहेत ते दिवस. मित्र, मजा, मस्ती, मधल्या सुट्टीतील डब्बे, पेन फाईट, हातावर छडी, मास्तर/मास्तरीन च्या गैरहजेरीत क्लास कॅप्टनचं फळ्यावर नावं लिहिणे, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब.. बापरे! काय-काय लिहू?
ख़ैर, ए.आय.च्या युगात आपण येऊन ठाकलोय आता फक्त टाइम मशीन कोणीतरी इन्वेंट करा रे!!

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

काय यार पार्टनर..

मी काय म्हणतो, 'इश्क़-विश्क, प्यार-व्यार मैं क्या जानू रे' ह्या गाण्याशी तुम्ही स्वतःला रिलेट करता का? जर करत असाल तर यू आर ऑफ़ माय-काईंड पीपल. कारण, मलाही प्रेम, मुहब्बत, इश्क़, लव्ह (वैगेरे) काही-काही कळत नाही. प्लीज आता हे म्हणू नका की "मुळात प्रेम समजून घेण्याची गोष्टी नाही तर ती अनुभव करून घेण्याची गोष्ट आहे". आय'एम टायर्ड ऑफ दिस सेंटेंस नाऊ. नथींग बट नॉन-सेन्स. काहीतरी नवं सांगा यारsss. 

बरं, असं अजिबात नाही की मी कधी प्रेम करायचं ट्राय केलंच नाहीये, ऑफकोर्स आय डिड, पण मी माझ्या विषयी बोलणार नाहीये. मी इतरांमध्ये काय नोटिस केलंय ते सांगतो. बरीच कपल एकमेकांशी आप-आपसात भांडत असतात,"तू ओवर पझेसिव्ह आहेस, सस्पीशियस आहेस" वैगेरे.. हे तर सोडाच! काही कपल्स तर, "काय यार पार्टनर, तू माझी जरा जास्तच काळजी करतोस, तू कधीच माझ्यावर चिडत नाहीस, प्लीज कधी तरी रेड फ्लैग हो ना रे" असल्या गोष्टींवर सुद्धा भांडतात. आजकालच्या माझ्यासारख्या इतर तरूण मित्र-मैत्रिणींना 'प्रेम' ह्या अडीच अक्षरा मागचं गूढ कधीच कळत नाही, जरी कळलेच तरीपण सपशेल दुर्लक्ष करतात. सगळं 'इन्स्टंट' आणि 'परफेक्ट' हवं असणार्‍या माझ्या जनरेशनमधे पेशंस अजिबात उरलेला नाहीये. पाच-पाच, दहा-दहा वर्ष सो-कॉल्ड रिलेशन मध्ये असणार्‍यांचे ब्रेक-अप झाल्यानंतर 'तो' किंवा 'ती' इतक्या लवकर कसं काय मूव्ह-ऑन होऊ शकतो/ते? त्याचं उत्तर मराठीतील एका म्हणीतून मला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येईल ती म्हण आहे "गरज सरो आणि वैद्य मरो". फर्दर, नो कमेंट्स! 

माझ्याबाबतीत तुम्हाला सांगायचंच झालं तर 'मी वसंतराव' ह्या मूव्ही मधील, 'ललना ना भेटली हवी तशी नसो उर्वशी' मला हे तंतोतंत लागू होतं. 

बाकी, जर कुणी असेल माझ्यासाठी 'इन्स्टंट' होकार देणारी 'परफेक्ट' मुलगी, तर जरूर कळवा!

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...