माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

मृत्यू हीच विश्रांती..

ध्यान-अनुष्ठान केल्याने भक्ती मार्ग सापडेल, पण ह्या इहलोकातून मुक्तीचा एकच पर्याय, तो म्हणजे 'मृत्यू'..

बापरे, जरा जास्तच डीप सिरियस झालोय मी, नाही? 

पण, मला वाटत नाही हा विषय आपण सगळ्यांनी इतका गांभीर्यानं घेतला असावा जितका अपेक्षीत आहे. माझ्या व्हेरी फर्स्ट ब्लॉग मध्ये 'जोवर श्वास आहे तोवर कसल्याही गोष्टीची मला खंत वाटू नये' असं म्हणालो होतो. अजूनही तो ब्लॉग वाचला नसेल तर नक्की वाचा. त्या ब्लॉग मध्ये तुमच्या सारखाच मी सुद्धा फक्त जगण्यावरच फोकस केलं. सकाळी उठणे, कॉलेज मध्ये लेक्चर करणे, कोर्टात जाणे, घरी येऊन परत ऑफिसात जाणे, जेवण करणे आणि शेवटी झोप.

क्या लाइफ हैं, नाही? 

अ‍ॅक्च्युअली आजच्या घटकेला मी सुखी आणि समाधानी आहे. ह्याच लुप मध्ये माझा आठवडा असतो. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी वेगळा अनुभव आणि शिकवण देऊन जातो. पण हे कुठेतरी थांबणार हे नक्की. काल जगलो, आज जगलो, उद्याही जगायचंय असं म्हणता-म्हणता कधी आपल्याला मरण येईल हे कोणालाच सांगता येणार नाही. किंबहुना आज मी हा ब्लॉग लिहितोय, पण मला उद्याची गॅरंटी कोणी देऊ शकेल? असो.. 

भक्तीमार्गाने मोक्ष मिळू शकतो हे मलाही मान्य आहे. पण माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी ध्यान किंवा अनुष्ठान करणे इतकं सोप्पं नाही. साधू, संत, महात्मे ह्यांना भक्तीमार्गाने मोक्ष मिळविणे सहज शक्य आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला ह्या भू-तलावरील इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, संसार इत्यादीतून सुटका देण्याचा फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे 'मृत्यू'! 

आपण सगळे कामात, दिनचर्येत इतके मशगूल आहोत की बोलताना सहजपणे "माझ्याकडे मारायला सुद्धा वेळ नाही" असं पटकन बोलून देतो. ह्या सगळ्या जबाबदार्‍या आणि प्रपंचातून मुक्तीचा एकच मार्ग म्हणजे 'मृत्यू'! 

झी-टॉकीज वर कीर्तन ऐकताना ते महाराज खूप सुंदर वाक्य बोलून गेले, "मरण माझे मरून गेले झालो मी अमर". किती छान ना?

आयुष्य खूप छान आहे रे, फक्त ते जगता आलं पाहिजे..

बाकी, हाउज् यूअर लाइफ गोईंग? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...